गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (10:21 IST)

Maharashtra Rain Update : राज्यातील या जिल्ह्यांत पाऊस

देशात मान्सूनला दोन महिने पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती झाली आहे. देशात 8 टक्के अधिक पाऊस झाला असून ऑगस्टमध्येही देशाच्या अनेक भागात चांगला पाऊस होणार आहे.
 
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. फक्त मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरच अतिमुसळधारेचा अंदाज आहे. इतरत्र सर्वत्र चांगला पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्याचा अंदाज आहे.