शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (13:16 IST)

Rain Update : राज्यात या भागांत पुढील 24 तास पावसाचा यलो अलर्ट जारी

rain
दीर्घ विश्रांती नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्यानं राज्यात पुढील 24 तासांसाठी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह कोकण ते विदर्भ भागात मेघसरी बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. 

मुंबईत ढगाळ वातावरण राहील तर हलक्या ते मध्यम सरी बसरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सातारा, जळगाव आणि कोल्हापुरात पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

मुंबईत आज सकाळ पासून पावसाच्या मध्यम सरी येत आहे. पुढील काही दिवस मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पाऊसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

पुढील तीन चे चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता वर्तवली असून कोकणात सर्वत्र वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यातील पालघर, रायगड, ठाणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, अकोला, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर, आणि यवतमाळ येथे काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 
Edited by - Priya Dixit