सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (19:00 IST)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा करणार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होण्याचे वृत्त आहे. 
 
राज ठाकरे यांच्या वडिलांनी श्रीकांत ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे जुन्या भाषणांचे संग्रहण केले आहे. त्यांनी ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड केली आहे. ते भाषण राज ठाकरे यांनी जपून ठेवले आहे.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. 
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी बाळासाहेबांच्या  भाषणाची उद्धव ठाकरे यांना     गरज आहे. त्यांनी राज ठाकरे यांना फोन वर संवाद साधण्याचे सांगितले जात आहे. अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 
 
बाळासाहेबांवरील चर्चेच्या निमित्ताने दोन्ही नेते आपसात बोलणार आहेत. असं असलं तरी राजकीयदृष्ट्या दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या महिन्यात राज आणि उद्धव एकत्र येणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. शेवटी राज ठाकरेंनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या
 
 
 
Edited by - Priya Dixit