संबंधित माहिती
- औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन, वाचा काय सुरु, काय बंद?
- कुख्यात गजा मारणेचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल
- गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी; नक्षल कॅम्प केला उद्ध्वस्त
- मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल
- राज ठाकरे यांनी मास्क लावावा म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्र
मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंचा सवाल
मुंबई- आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महिलांना शुभेच्छा देत असा सवाल ही केला आहे की 'मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करत 'आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही असे मत मांडले आहे.
त्यांनी म्हटले की आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" . तसेच ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे.
