राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली, वाहतूक बंद
कसबा बावडा :गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार तसेच धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा येथील कोल्हापूर पद्धतीचा राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. पाणी पातळी 17 फुटांवर गेली असून,बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेली महिनाभर दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपाासून पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. पावसाअभावी कोमजलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणपाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्र काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी राजामार बंधारा पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.