1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2018 (08:26 IST)

राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यासाठी आंदोलन

rashatrawadi congress

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाड्यातून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात होणाऱ्या या आंदोलनाची उस्मानाबादमधील उमरगा येथून १६ जानेवारीपासून सुरुवात होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आढावा बैठक घेतली. यावेळी सरकारविरोधात पुन्हा हल्लाबोल करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत राष्ट्रवादीकडून देण्यात आले. उस्मानाबादमधून सुरुवात होणारे आंदोलनाचा शेवट हा ३१ जानेवारीला औरंगाबादमध्ये होईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.  

मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, जयदत्त आण्णा क्षिरसागर, आमदार राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.