रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात
फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष दिले आहेत. त्यात आदित्य ठाकरे प्रामुख्याने पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे पुढील नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे असेल, पण उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार का? या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे १५-२० वर्ष राजकारणात सक्रीय आहेत. त्यांना राजकारणात एक कालखंड लोटला. आमदार, मंत्री, पक्षाचे नेते म्हणून ते काम करतायेत. रश्मीवहिनी महिलांच्या कामासंदर्भात सक्रीय असतात. जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो त्या महिला येऊन भेटतात. त्यात त्या रश्मीवहिनी सहभागी होतात. ठाण्यात आमच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदेवर हल्ला झाला, तिथे त्या धावून गेल्या, रात्रभर तिथे पदाधिकाऱ्यांशी संपर्कात होत्या, पण त्या विधिमंडळ राजकारणात येतील असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor