मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (09:40 IST)

ईडी चौकशीनंतर रवींद्र वायकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

Facebook
जोगेश्वरीतील कथित भुखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांना यापूर्वी 17 जानेवारी व 23 जानेवारी रोजी चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले होते. त्यानुसार रवींद्र वायकर  ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आणि रात्री नऊ वाजता कार्यालयाबाहेर पडले. यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की,  ईडीने माझ्या घरी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्यांनी सांगितले की, सुप्रिमो अॅक्टीव्हिटी सेंटर बांधलं त्या अनुषंगाने 2002 पासून ते आतापर्यंतचे कागदपत्र आम्हाला पाहिजे आहेत.
 
आता 19 वर्षांचे कागदपत्र एका आठवड्यात देणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतला होता. एक तर माझी तब्येत बरी नव्हती आणि एवढ्या कमी वेळात कागदपत्र जमवून आणून देणे शक्य नव्हते. तसेच इनकम टॅक्सच्या कायद्यानुसार 7 वर्षांपर्यंत कागदपत्र देणे गरजेचे आहे. परंतु त्यांनी 19 वर्षांचे कागदपत्र एकदम मागितल्यामुळे मला कागदपत्र द्यायला वेळ लागला. परंतु आज त्यांनी मला चौकशीसाठी बोलावले होते त्यानुसार मी आज चौकशीसाठी आलो होतो, अशी माहिती रवींद्र वायकर यांनी दिली.
 
 
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून माझ्याविरुद्ध बांधकामाची तक्रार दाखल करण्यात आली होती. अॅक्टीव्हीटी सेंटर बांधलं होतं त्याला ओसी वगैरे सर्व होती. 19 वर्ष ते चाललं, तेव्हा कोणी तक्रार केली नव्हती. ते तोडून नवीन डीसीआर आल्यानंतर त्याच्या माध्यमातून तोडून बांधायला गेल्यानंतर आताच्या कायद्याने मान्यता देतील. मुंबई पालिकेने मान्यता दिल्यानंतर 2 वर्षे त्याठिकाणी काम झालं. काम झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर राजकीय दबाव आला आणि कमिशनच्या माध्यमातून त्याला काम थांबवण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली.

आम्ही त्याला न्यायालयात विरोध केला आहे. ईडीकडून 9 तास चौकशी करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय दबावातून ईडी चौकशी झाल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केला आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor