वाचा, 'म्हणून' विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्यात आले
विधानसभेचे अधिवेशन 18 तारखे पासून सुरू होणार होते. मात्र, राज्यात त्यापूर्वी सत्तातर झाल्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. याबाबत विधिमंडळाने प्रसिद्धिपत्रक काढले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात 18 जुलै पासून सुरू होणारे विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना अधिवेशन पुढे ढकलल्याचे कळविण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल,असे म्हंटले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख २०२२ च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १८ जुलै २०२२ पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे विधिमंडळाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.