सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (09:02 IST)

पोलीस महासंचालकांच्या घरी चोरी

नागपूरमध्ये माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाली आहे. प्रबीरकुमार चक्रवर्ती यांचे नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात चार मजली इमारतीचे घर आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर देवघर आहे. १३ जानेवारीला सकाळी या देवघरात नियमितपणे पूजेसाठी येणाऱ्या पुजाऱ्याला देवघरातील काही सोने आणि चांदिचा ऐवज गायब झाल्याचे जाणवले. पुजारीने घरातील सदस्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर घरातील सदस्यांनी घरातच वस्तू शोधल्या. मात्र, घरात या वस्तू न मिळाल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोराचा शोध सुरु केला आहे.