बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हैदराबाद हाऊसप्रमाणे जीना हाऊस इंटरनॅशनल सेंटर बनणार

दिल्ली येथील हैदराबाद हाऊसप्रमाणे मुंबईतील जिना हाऊस देखील इंटरनॅशनल सेंटर बनणार आहे. उच्चस्तरीय परदेशी शिष्टमंडळ आणि विशेष पाहुण्यांना त्याचबरोबर द्विपक्षीय चर्चेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ भोजनाचा कार्यक्रम दिल्ली येथील हैदराबाद हाऊसमध्ये होतो. याच धर्तीवर आता मुंबईच्या जिना हाऊसचा वापर करण्यात येणार आहे. 
 
मोहम्मद अली जिना यांनी १९३६ मध्ये मुंबई येथील मलबार हिल येथे ही वास्तू उभारली होती. त्याकाळात ही इमारत बनवण्यासाठी २ लाख रूपये खर्च आला होता. यावेळी या इमारतील साऊथ कोर्ट म्हटले जात होते.  ही इमारत २.५ एकरमध्ये बनवली गेली आहे. भारतीय आणि गॉथिक शैलिचा मिलाफ या वास्तूनिर्मितीमध्ये पाहायला मिळतो.