बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:20 IST)

लोकसभेत सरोगसी नियामक विधेयक मंजूर

सरोगसी नियामक विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर झाले. भारतात सरोगसीतून निर्माण होत असलेल्या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. महिला आणि लहान मुलांची पत राखण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. सोबतच व्यावसायिक वापर रोखण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.