सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (16:58 IST)

पर्रिकरांनी केली पुलाची पाहणी, नाकात होती ड्रीप

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कित्येक महिन्यांच्या कालावधी नंतर घराबाहेर पडले आणि त्यांनी पणजी येथे सुरु असलेल्या तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या नाकात ड्रीप होती. प्रकृती योग्य नसतानाही मुख्यमंत्री पर्रिकरांकडून मांडवी पुलाची पाहणी केली.
 
रविवारी दुपारी 3 च्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या कारने घराबाहेर पडले. त्यांनी पर्वरीच्या बाजूने येत मेरशी पर्यंत पुलाच्या कामाची पाहणी केली. मांडवीचा तिसरा पुल हा पर्रिकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 12 जानेवारी रोजी त्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.