गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जुलै 2018 (13:24 IST)

अंधेरी पूल कोसळला : मोटरमनने वाचवले अनेकांचे प्राण

अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यावेळी बोरिवलीवरुन चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेचा अपघात होता होता वाचला. मोटरमनने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे अनेक   नागरिकांचे प्राण वाचले आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. लोकल बोरिवलीवरुन चर्चगेटच्या दिशेने जात असताना पुलाचा काही भाग कोसळत असल्याचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या लक्षात आले. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत काही अंतरावर इमर्जन्सी ब्रेक दाबत लोकल थांबवली. मोटरमनच्या या प्रसंगावधानने अनेकांचे प्राण वाचले आहेत. मोठा अपघात टळला आहे. नाहीतर इतक्या पावसात मुंबईवर मोठे संकट कोसळले असते. मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. तर नाले आणि रस्ते पावसाच्या पाण्याने भरून गेले आहे. यामुळे अनेकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे कामावर जाणारे आणि इतर कामासाठी मुंबईत आलेले यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहेत. गरज नसली तर कृपया प्रवास करू नका अश्या सूचना करण्यात आल्या आहेत.