गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:31 IST)

एस टी करणार मालवाहतूक सुरु सोबत पुरवणार गोदामे सुद्धा

The ST will also carry the warehouses that will carry the cargo
एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे. सोबतच ते  गोदामांच्या व्यवसाय देखील करणार आहे. या नवीन उपक्रमात  महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाययोजना सध्या राबविण्यात येत आहे. स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती  केली जाणर आहे असे  मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले आहे. महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद असून, आज पर्यंत दुर्लक्षित असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा  वापर करण्याचा निर्णय मंत्री रावते यांनी घेतला आहे. रेल्वे मालवाहतुक जेसे होते त्याच धर्तीवर आता एसटीचीही मालवाहतूक सुरू  होणार आहे. या  मालवाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे. मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरली जाणार आहेत.  सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे 9 वर्षांनंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण केले जाते.  त्यास परिवहन विभागाची रीतसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत.  यामुळे कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक केली जाणार आहे.