भाजपने अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे, रोहित पवार यांचा टोला
देशाच्या सुरक्षे बाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? हे अतिशय गंभीर आहे. भाजपने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा पत्रकार अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करणे गरजे आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना लगावला. बारामती येथे आयोजित कृषि तंत्रज्ञान सप्ताहानंतर रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या बाबत भाजप करत असलेले हे आंदोलन राजकीय हेतूने होत आहे. भाजपाने खरेतर अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. व राज्य भाजपाने केंद्राला लिखित पत्राद्वारे गोस्वामी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. गोस्वामीना गोपनीय माहिती तीन दिवस अगोदरच कशी समजते. देशाने बागलकोटवर केलेल्या हल्ल्याची गोस्वामीला तीन दिवस अगोदरच माहिती होती. एवढी मोठी गोपनीय माहिती भाजपाची बाजू घेणाऱ्या पत्रकाराला मिळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंडे ऐवजी भाजपाने गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे असे पवार म्हणाले.