शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (20:53 IST)

अनिल देशमुखांना चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे विचारणार प्रश्न

मनसुख हत्या आणि जगविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया प्रकरणाबाबत फार महत्त्वाची घडामोड समोर आली असून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चांदीवाल समिती नेमण्यात आली आहे. या समितीसमोरआता माजी  मंत्री  अनिल देशमुखांना आज हजर करण्यात आले आहेत. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर चांदीवाल आयोगाने सचिन वाझेंना परवानगी दिली.
 
चांदीवाल आयागोसमोर ज्याप्रकारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी केली जात आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चांदीवाल आयोग शासनाकडे आपला अहवाल सादर करणार आहे.
 
मनसुख हत्या प्रकरणी आणि अँटिलिया प्रकरणाबाबत सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. परंतु सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांना काही प्रश्न विचारण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर आयोगाने त्यांना परवानगी दिली. सचिन वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही प्रश्न विचारले आहेत.