शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:21 IST)

सर्व आमदार बिनकामाचे, शिवरायांचा नावाचा राजकीय वापर- भिडे

sambhaji bhde

आज पर्यंत शिवरायांचा नावाचा वापर राज्यकर्त्यांनी फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र मधील राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते.प्रतापगडाच्या कुशीत  महाराजांचं स्मारक व्हावे, असं का एकाला सुद्धा वाटत नाही? असा सवाल संभाजी भिडे यांनी यावेळी उपस्थित केला.

बैठकीत भिडे म्हणाले की  शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आजपर्यंत राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला आहे. लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणं घेणं नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचं स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं म्हणत संभाजी भिडे यांनी आमदारांवर निशाणा साधला आहे. सोबत स्थानिक आमदार भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर ही टीका भिडे यांनी केली आहे. भिडे म्हणतात की  खासदार संजय पाटील हे मराठा समाजाचे असून  त्यांना शिवरायांचं स्मारक व्हावं असं ते कधीही म्हणाले नाहीत. त्यांनी फक्त  शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. तर आपला देश दहशतवाद, आंतकवाद यामध्ये अडकला असून तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अंमलात आणत नाही. त्यामुळे राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभे केले आहेत, हे सर्व राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. भिडे यांनी भीमा कोरेगाव दंगल भडकवली असा आरोप त्यांच्यावर आहे.