रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (11:23 IST)

संभाजी भिडेंचा टिपू सुलतान जयंतीला विरोध

शिवप्रतिष्ठानने आता टिपू सुलतान जयंतीवर आपली आक्रमक भूमिका मांडत सांगलीसह महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान यांची जयंती साजरी करू नये, यासाठी प्रशासनाला निवेदन केले आहे.
 
शिवप्रतिष्ठानकडून मोटरसायकल रॅली आयोजित केली गेली होती मात्र रॅलीला परवानगी नाकारण्यात आल्यावर संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन 20 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करु नये, याबाबत निवेदन दिलं आहे.