1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (20:37 IST)

महिला पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडेचें वादग्रस्त विधान, महिला आयोग नोटीस पाठवणार

sambhaji bhide
संभाजी भिडे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटींना आलेले संभाजी भिडे यांनी एका वृत्तपत्राचा महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी कपाळी  टिकली लावली नसल्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी कपाळावर टिकली लावायला पाहिजे. स्त्री म्हणजे भारतमातेचे रूप असून भारत माता विधवा नाही.आधी कपाळी कुंकू लाव नंतर मी तुझ्याशी बोलतो असं संभाजी भिडे यांनी आपले मत मांडले. त्यांच्या अशा विधानामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहे. या वरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना या वादग्रस्त विधान दिल्या बाबत नोटीस पाठवण्याचे म्हटले आहे. टिकलीवरुन महिलेचं पद ठरवणं हे चुकीचं आहे. 'त्या' वक्तव्याबाबत संभाजी भिडेंना नोटीस पाठवणार.असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. 
 
Edited By - Priya Dixit