सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (08:19 IST)

संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेने सुमारे पाच तास चौकशी केली

sanjay raut
Sandeep Raut's brother Sandeep Raut उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेने सुमारे पाच तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. लवकरच त्यांची पुन्हा चौकशी होणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान आपण काहीही चुकीचे काम केले नाही, त्यामुळे तपास यंत्रणेला सहकार्य करणार असल्याचे संदीप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
कोरोना काळात महानगरपालिकेकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप करण्याचे योजना राबविली होती. त्यासाठी मनपाने 52 हून अधिक खासगी कंपन्यांना सुमारे सहा कोटीचे कंत्राट दिले होते. ही रक्कम संबंधित कंपन्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप करुन आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तपास सुरू केला होता. याच प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे मित्र सुरज चव्हाण यांची पोलिसांकडून चौकशी झाली होती. या चौकशीत 45 लाख रुपये सह्याद्री रिफ्रेशमेंटने सल्लागार सेवा देण्यासाठी सुजीत पाटकरला दिले होते. त्यात संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते.