शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (16:30 IST)

Sangali : सांगलीच्या नदीपात्रात मगर आणि तरुणाचा सामना

Sangali
Sangali : सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात दरोज प्रमाणे पोहायला गेलेल्या तरुणाचा सामना एका मगराशी झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. राजदीप कांबळे असे या तरुणाचे नाव आहे. सांगलीत कृष्णा नदीत दररोज तरुण पोहायला जातात. या नदीपात्रात घाटाजवळ मोठ्या मगरींचा वास आहे. या परिसरात पोहणारे नेहमी सावध राहतात.

दररोज प्रमाणे राजदीप कांबळे सांगलीवाडीच्या बाजूने बायपास पुलावरून समर्थ घाटाकडे पोहोत येत असताना सांगलीवाडी कडून एक मगर मध्यभागी आला. राजदीप देखील एका टोकाने येत असताना पात्राच्या काठी उभे असलेल्या लोकांनी पहिले. दोघे एकमेकांकडे येत असताना लोकांचा काळजाचा ठोका चुकला.

पुढे काय होणार हे लोक विचार करत असताना तेवढ्यात मगराने पाण्यात डुबकी घेत तळाशी गेला. लोकांनी हे बघून सुटकेचा श्वास घेतला. राजदीप सुखरूप तळावर आला. 
 
 
Edited by - Priya Dixit