गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2023 (17:52 IST)

पतीला सुट्टी मिळेना; पत्नीने केले ठिय्या आंदोलन

social media
सांगलीमध्ये पतीच्या सुट्टीसाठी पत्नीने चक्क आंदोलन केल्याची घटना घडली आहे. पतीने रजेसाठी अर्ज देऊन देखील त्याची सुट्टी मंजूर न केल्यामुळे संतापलेल्या पत्नीने सांगलीच्या आटपाडी येथे एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालना समोर झोपून चक्क आंदोलन सुरु केले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली होती. विलास कदम असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते गेल्या 33 वर्षांपासून एसटी चालक म्हूणन आपले कर्तव्य बजावतात. त्यांची 270 दिवसांची रजा शिल्लक असून ते येत्या काही दिवसांतच सेवा निवृत्त होणार आहे. त्यांनी आजारी बायकोला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांचा सुट्टीचा अर्ज आगारप्रमुखांकडे 6 मार्च रोजी दिलेला असून त्यांचा सुट्टीचा अर्ज आगारप्रमुखांनी फेटाळला असून त्यांच्या पत्नीने नलिलीने चक्क आगार प्रमुखांच्या केबिनच्या बाहेर अंथरूण टाकून झोपून आंदोलन सुरु केले. आगारप्रमुखांनी अखेर विलास कदम यांची एक दिवसांची रजा मंजूर केली आहे. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरु होती.     

Edited By - Priya Dixit