गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सांगली , बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (12:45 IST)

चहात फिनेल तर गुलाबजाममध्ये विष

arrest
सांगलीत पतीला जेवणाच्या डब्यातील खाद्य पदार्थात विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पत्नीने  जेवणात तब्बल तीन वेळा विष घालून नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी पतीचे प्राण बचावले. एकदा जेवणाच्या डब्यात, तर दुसऱ्यांदा चहामध्ये फिनेल घातले. तिसऱ्या वेळी गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचे औषध घातले होते. मात्र पत्नीने वारंवार गुलाबजाम खाण्याबाबत केलेल्या आग्रहामुळे पतीच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने खडसावून विचारताच पत्नीने कृत्याची कबुली  देत माझी चूक झाली, माफ करा, मी पुन्हा असे करणार नाही, असे सांगितले. त्यावरुन हा प्रकार उघडकीस आला. 
 
यानुसार तिच्यावर कलम 307 आणि 328 नुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली. इस्लामपूर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.दिली. त्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली. इस्लामपूर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.