मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा दारुण पराभव
social media
फोटो स्रोत : सोशल मीडिया
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.
अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीची लाट मिळेल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निकालात स्वामी समर्थ पॅनेलचे स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. स्वरूपानंद देशमुख यांना ९२ मतांच्या फरकाने विजय मिळाला आहे. यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत तब्बल 84 टक्के मतदान झाले होते. भावनिक वातावरण, गावातील प्रतिष्ठेची लढत आणि संतोष देशमुख प्रकरणाची पार्श्वभूमी यामुळे ही निवडणूक अत्यंत चर्चेत होती
मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. त्यांना आदरांजली देण्यासाठी ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध होऊन त्यांच्या पत्नीला सरपंचपदी निवडण्याची मागणी केली. त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख हे निवडणूक लाडवण्यासाठी उभे झाले आणि विजयी झाले.
अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीमुळे मते मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निकालावरून नेतृत्व क्षमतेची निवड स्थानिकांनी केल्याचे समजते.
Edited By - Priya Dixit
