रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (21:30 IST)

सप्तश्रृंगी गडावर न्यायाधीशांच्या हस्ते महापूजेने चैत्र उत्सवाला सुरुवात

साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध पीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी  देवीच्या  चैत्र उत्सवाला सुरुवात झाले आहे.पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.  सकाळची पंचामृत महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.  या वेळी संस्थानचे अध्यक्षा तथा अति. सत्र न्यायाधीश, यु.एम.नंदेश्वर विश्वस्त राजेंद्र  सूर्यवंशी, रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी  भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते. त्यानंतर  नवचंडी व होमहवन पूजन होऊन संस्थांनच्या कार्यालयात आई साहेबांच्या पादुकांची पूजा करून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. त्यात संस्थान कार्यालयापासून मिरवणूक काढून शिवालय तीर्थावर जल पूजन करून पहिली पायरी येथे पालखीची विधिवत आरती करण्यात आली. या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांपैकी ८ ते १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सव दरम्यान २ वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा देण्यात येणार असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे.