बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (11:14 IST)

मिलिदिं एकबोटे यांना अटक का केली नाही?

कोरेगाव भीमा प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचा सवाल
 
कोरेगाव भीमा प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी केली. याप्रकरणी मिलिदिं एकबोटे यांना अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल यावेळी कोर्टाने विचारला. एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आता पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षणही मिळाले आहे.
 
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिदिं एकबोटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीसह एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक टाळण्यासाठी एकबोटे यांनी आधी पुणे सत्र न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 
 
या दोन्ही ठिकाणी एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
 
दरम्यान, एकबोटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी होऊन त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. 
 
ही मुदत संपत असताना पुन्हा सुनावणी झाली असता एकबोटे यांना नव्याने दिलासा मिळला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे.