शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2024 (09:37 IST)

राहुल नार्वेकर-मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक

Rahul Narvekar
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन दिवस उरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच निर्णय देणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या निकालापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडल्याने विरोधकांनी त्यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा सुद्धा राजकीय भूकंपाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केली होती.
 
त्यानंतर आता अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार? अशी चर्चा केली जात आहे.
 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी आहेत. आजारी असूनही नार्वेकर हे ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती. पण अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही गुप्त भेट होती. पण मीडियाला या भेटीची कुणकुण लागली. ‘वर्षा’ बंगल्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बैठक सुरू आहे. तिसरा कोणताही नेता यावेळी उपस्थित नाही. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor