बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (20:53 IST)

‘कोकण रेल्वे’मार्गावर सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’एक्स्प्रेस धावली सुसाट

kokan raiway
रत्नागिरी :देशभरातील विविध मार्गांवर ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरही या हायस्पीड रेल्वेची मंगळवारी चाचणी घेण्यात आली. मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर ही चाचणी यशस्वी झाली. मुंबईवरुन गोव्यासाठी 16 डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली.
 
वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे 5.35 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटून गोव्यात मडगावला दुपारी 2.30 वाजता पोहोचली आणि पुन्हा सायंकाळी मडगावहून मुंबईकडे मार्गस्थ झाली. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी मंगळवार 16 मे रोजी घेण्याचे नियोजित होते. देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली होती. मात्र या मार्गावर धावलेली तेजस एक्स्प्रेस ही जर्मन बनावटीची आहे. त्याच मार्गावर आता भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस नेमकी कधी धावणार, याची गेले अनेक महिने प्रवाशांना उत्सुकता होती.
 
देशभरातील विविध मार्गांवर ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. पण आता कोकण रेल्वेमार्गावर या रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे 5.35 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटली. गोव्यात मडगावला दुपारी 2.30 वाजता पोहोचली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाल्याचे रेल्वेच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
 
मुंबईवरुन गोव्यासाठी 16 डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. ट्रायल रनसाठी कोकण रेल्वे मार्गावरील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस अँड टी सुपरवायझर अलर्ट मोडवर होते. कोकण रेल्वे मार्गावर वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले होते. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.