शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (07:59 IST)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा अपघातात मृत्यू

death
नाशिक  -  धुळे- सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मूळचे रायजादे हे त्यांच्या दिवंगत बहीण, राष्ट्रवादीच्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखा क्षीरसागर यांच्या धार्मिक विधीसाठी बीड येथे दर महिन्याला जातात. तेथील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या मुलासह नाशिकला येत असताना हा अपघात झाला.  चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने गाडी डिव्हायडरला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात रायजादे यांचा जागीच मृत्यू तर त्यांचा मुलगा प्रीतम रायजादे हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor