शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (08:23 IST)

खळबळजनक ; विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्या पत्नीची आत्महत्या

Sensational; Former University Vice Chancellor Sudhir Meshram's wife commits suicide Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्या पत्नी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (वय-५५) यांनी सोमवारी पहाटे मनीषनगर येथील जयंती मॅन्शन-७ या अपार्टमेंटच्या ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
 
डॉ.प्रा.ज्योत्स्ना मेश्राम या जयताळ्याला राहतात.त्यांना एक मुलगा असून तो अमेरिकेत राहतो.आठ दिवसांपूर्वीच त्या मुलाकडून स्वगृही परत आल्या होत्या.मनीषनगरातील जयंती मॅन्शन-७ मध्ये त्यांची मावशी राहते.रविवारी राखी असल्याने त्या मावशीकडे आल्या होत्या.सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
 
माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्या मृत्यूपासून त्या माानसिक तणावात होत्या.तसेच त्या विभागप्रमुख असल्याने नॅकची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.नॅक कमिटी दौऱ्यावर येणार होती.त्यामुळेही त्या तणावात असल्याचे सांगितले जात आहे.मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे.