समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि कंटेनरची धडक दोघे जखमी
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला झोप लागल्याने ट्रक अनियंत्रित होऊन समोरील कंटेनरवर आदळला. हा अपघात 24 जुलै रोजी पहाटे 4 वाजता समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवर झाला.
नाशिकहून पाटणाला जाणारा फुलकोबीने भरलेला ट्रक नागपूर कॉरिडॉरच्या जवळ त्याला डुलकी लागल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन समोरच्या कंटेनरला आदळला अपघात इतका भीषण होता की ट्रकचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणात खराब झाला.
चालक सिबुलो पाल आणि क्लीनर अनिल कुमार मुन्नालाल दोघेही त्यात अडकले. माहिती मिळताच महामार्ग बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांना क्रेन आणि कटर मशीनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. चालक सिबुलो पाल यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दोघांनाही रुग्णवाहिकेने उपचारासाठी सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Edited By - Priya Dixit