सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2017 (17:31 IST)

दानवे पदावर राहणे विरोधकांच्या फायद्याचे : शरद पवार

रावसाहेब दानवे पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे, त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता? अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. अशावेळी शरद पवारांनी मात्र, विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी करु नये असे म्हटले आहे. दानवेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा फायदा विरोधी पक्षाला होणार आहे असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. यावेळी बोलताना पवारांनी कार्यकर्त्यांनाही कानपिचक्‍या दिल्या.