भूमिका बदलणाऱ्या भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहाणार नाही -- शरद पवार
काही आमदारांनी महायुतीत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 30 ते 32 आमदारही गेले आहेत. शरद पवार यांचीच ही खेळी असल्याचा आरोप होत आहे. या सर्व आरोपांना शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या सोशल मीडिया कार्यशाळेच्या कार्यक्रमात एक प्रकारे उत्तर दिले आहे. भाजपसोबत गेलेल्यांनी पक्ष फोडला नसून त्यांनी पक्षांतर केले असल्याचं सांगत पवारांनी, “राजकारणामध्ये सत्याची कास सोडून, कोणी दमदाटी करत आहे म्हणून भूमिका बदलणाऱ्या भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहाणार नाही.” असा इशारा दिला आहे.
महायुतीत सहभागी होत अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाले आहेत. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आठ आमदारही मंत्री झाले आहेत. या सर्वांना तुरुंगात जाण्याची भीती होती, त्यामुळे या भेकड प्रवृत्ती भाजपच्या दावणीला जाऊन बसल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor