सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (17:18 IST)

Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा शरद पवार यांचे भाष्य

sharad panwar
सध्या धनुष्य बाण कोणाचा या वर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सर्वोच नायायालयात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देत शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हाची मागणी करण्यापेक्षा स्वतंत्रपक्ष काढावा, एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही असे भाष्य केले. मी काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर माझा स्वतंत्रपक्ष काढून त्याचे चिन्ह वेगळे घेतले मी काही काँग्रेसचे चिन्ह मागितले नाही. चिन्हासाठी वाद वाढवणे हे अजिबात योग्य नाही. बारामतीत पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले. या वर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत म्हणाले की, ज्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून स्वतःचे वेगळे पक्ष काढले त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात नव्हता.पण आज असं नाही.आज पक्षांतरबंदी कायदा आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेसाठी कायदेशीर लढाई लढत आहे. असं त्यांनी म्हटले आहे.