शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (17:08 IST)

Nashik : बाल्कनीतून तोल जाऊन दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Baby Girl falling from building :   घरात लहान मुलं असतात तर त्यांच्या कडे बारीक लक्ष ठेवावं लागत. लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. नाशिक मध्ये खेळताना खिडकीतून तोल जाऊन दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. समृद्धी राहुल खैरनार असे या चिमुकली चे नाव आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास नाशिकात सिडकोतील पवन नगर भागात साई ज्योत अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या राहुल खैरनार या कुटुंबियातील समृद्धी खिडकी जवळ खेळत असताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण पडल्यामुळे तिच्या मेंदूत अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि उपचाराअंतर्गत तिची प्रकृती खालावत गेली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला. 
चिमुकल्या समृद्धीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.