संबंधित माहिती
- नाशिक मध्ये शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला काळे फासले
- एकनाथ शिंदे गटातील आ.केसरकर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाले, एकनाथ शिंदेंना नेते म्हणून उद्धव साहेबांनीच केले
- एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेनं सरकार टिकवण्यासाठी पारित केले 6 प्रस्ताव
- उपसभापतींनी बंडखोर आमदारांना नोटीस बजावली, शिंदे गट कोर्टात आव्हान देणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल,स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचा हा व्हिडिओ आहे. त्यात गोगावले यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच अतिशय गंभीर आरोप केला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार तथा मुख्य प्रतोद श्री.भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका #WeSupportEknathShinde@BharatGogawale pic.twitter.com/05sNkDSyAU
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सेना आमदारांची उद्धव यांनी साधी बैठक तरी घेतली का, असा खडा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी देत होते, असे गोगावले यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेनेचे खच्चीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुढे जात होता. या सर्व कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे आम्हा सर्व शिवसेना आमदारांना आधार दिला. आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
