सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 4 जानेवारी 2020 (12:00 IST)

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेची भगव्याशी तडजोड - नितीन गडकरी

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून शिवसेनेनं भगव्याशी तडजोड केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढलेले भाजप आणि शिवसेना निकालानंतर वेगळे झाले. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन दोन्ही पक्षात ताटातूट झाली. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडींवर नितीन गडकरींनी आपली भूमिका मांडत शिवसेनेवर निशाणा साधला.
 
"शिवसेनेनं त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले. शिवसेनेनं याआधी भगवा फडकवण्याची भाषा केली होती. मात्र आता काँग्रेसच्या रंगात शिवसेना मिसळलीय," असं गडकरी म्हणाले.