शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (19:12 IST)

शिवसेना शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का

eknath uddhav
शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून शिंदे गटाने शिवसेनेच्या पक्षनिधीवर दावा केला आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल  करण्यात आली आहे. या याचिकेत शिवसेना भवन, सर्व बँकेतील पक्षनिधी आणि सर्व शाखा एकनाथ शिंदे शिवसेनाला देण्याची मागणी केली आहे. आशिष गिरी मुंबईतील या वकिलांमार्फत सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली असून पक्षाचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून मिळाल्यावर शिंदे गटाची शिवसेना झाली असून शिवसेनेचा पक्षनिधी आणि चल अचल संपत्ती शिवसेना शिंदे गटाला देण्याची मागणी करीत असून सुप्रीम कोर्टात याचिका देण्यात आली.
 
Edited By - Priya Dixit