मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (08:55 IST)

लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, सामनातून शिवसेनेची मागणी

लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने मुखपत्र सामनातून केली आहे. नक्षलींचा मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट होता, लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, त्यांना उदंड, निरोगी, दिर्घायुष्य लाभो अशी सदिच्छाही सामनातून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
 
हे सर्व लोक नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच असेही सामनातून म्हटले आहे.