सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लाल चौकात फारुख अब्दुल्लांना फासावर लटकवा - सामना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. यामध्ये सामना मधून जोरदार टीका केली आहे. शिवसेना सहकारी पक्ष जरी असला तरी शिवसेना विरोधात रोज नवीन हल्ला भाजपवर करत आहे. काश्मीर मुद्द्यावर फारूक अब्दुल्ला यांना फासावर लटकवा असे सामनातून जोरदार टीका केली आहे.डॉ. अब्दुल्ला हे ठार वेड्यासारखे बरळले आहेत. काय तर म्हणे, नोटाबंदीमुळे कश्मीर खोऱ्यांत दहशतवाद संपला असून शांतता निर्माण झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. पण दहशतवाद कमी झाला असेल तर कश्मीरात रोज जवान शहीद का होत आहेत? अब्दुल्लांचे बरळणे हे खरेच वेडेपणाचे आहे काय? सगळाच गोंधळ आहे. असा सामना  मधून टीका केली आहे.
सामनातील काय आहे लेख ? 

फारुख अब्दुल्ला यांची विधाने किती गांभीर्याने घ्यावीत, हा प्रश्नच असतो. मग हाच विचार करायचा झाला तर फक्त अब्दुल्लाच कशाला? देशातील सध्याचे सत्ताधीश म्हणा किंवा इतर पक्षांचे राजकारणी रोज जी ‘हवाबाण हरडे’ पद्धतीची विधाने करीत असतात ती तरी किती गांभीर्याने घ्यावीत? काल कोणती थुंकी उडवली व कोणते ‘हवाबाण’ सोडले याचा आज पत्ता नसतो. पुन्हा देशभक्ती व देशद्रोहाच्या व्याख्या जो तो आपापल्या बालबुद्धीप्रमाणे ठरवीत असतो. तरीही अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त विधानांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. डॉ. अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा त्यांचे तोंड वाईट पद्धतीने उघडले आहे. अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत व ते चीड आणणारे असले तरी कटुसत्य आहे. पाकव्याप्त कश्मीरला पाकिस्तानच्या जबड्यात हात घालून पुन्हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग बनवू किंवा पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा तिरंगा फडवूच! असे नरेंद्र मोदी व भाजपातील त्यांचे सहकारी छातीठोकपणे सांगत होते. लोकसभा

निवडणुकीच्या प्रचारात तर
या ‘५६ इंची’ छातीच्या मुद्यांवरच मोदी यांनी प्रचारसभांतून टाळ्या व नंतर भरघोस मते मिळवली. प्रत्यक्षात तीन वर्षांत काय घडले? पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून ‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही, हे सत्य कसे नाकारणार? यावर डॉ. अब्दुल्ला आता वेड्यासारखे (?) बरळले आहेत की, ‘पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याच्या गप्पा मारता, पण आधी श्रीनगरातील लाल चौकात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवून दाखवा!’ अब्दुल्ला यांचे हे बरळणे आहे की जहाल सत्य याचा निवाडा पंतप्रधान मोदी यांनीच करायचा आहे. डॉ. अब्दुल्ला चुकीचे किंवा देशविरोधी बोलले असतील तर त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर लटकवा, नाहीतर अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे लाल चौकात हिंदुस्थानचा तिंरगा फडकवून दाखवा! स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशात तिरंगा डौलाने फडकवला जातो, पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला जात नाही हे स्वातंत्र्याचे व हुतात्म्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे अब्दुल्लांचे बरळणे वेडेपणाचे व मानसिक झटक्याचे असले तरीही त्यात तथ्य हे आहेच. डॉ. अब्दुल्लांचे बोलणे फोल ठरवायचे असेल तर