सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (14:59 IST)

धक्कादायक! डॉक्टरानेच केले नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार

rape
पीडितेचा गर्भपात करत अर्भक पुरले जमिनीत
वाशिम : जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला  काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टराने आपल्याच रुग्णालयातील एका महिला नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गोपाल इंगोले असे आरोपीचे नाव आहे. डॉक्टरने केलेल्या लैंगिक अत्याचाराने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील इंगोले बाल रुग्णालयातील डॉ. गोपाल इंगोले याने स्वतःच्या रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे पीडिता अनैतिक संबधांमुळे गर्भवती राहिली असता आरोपीने महिलेचा गर्भपात केला व अर्भक जमिनीत पुरले.
 
या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी तो पुरलेला अर्भक बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. डॉक्टर इंगोले याने महिलेच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर येत आहे.
 
दरम्यान, या घटनेनंतर विविध चर्चेला उधाण आले असून रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास उठतो की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.