रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:30 IST)

धक्कादायक ! 24 तासात दोन 16 वर्षांच्या मुलींची आत्महत्या; प्रचंड खळबळ

बीड जिल्ह्यात  वेगवेगळ्या ठिकाणी दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी  आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी दोन मुलींनी आत्महत्या केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील नेकनूर आणि केज तालुक्यात  या दोन घटना घडल्या आहेत.नेकनूरमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
 
रुपाली रमेश मुळे  (वय-16 रा. नेकनूर) आणि कोमल गोविंद गायकवाड (वय-16 रा. मस्साजोग) अशी आत्महत्या केलेल्या दोन मुलींची नावे आहेत. कोमल गायकवाड या मुलीने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
 
या दोन्ही मुलांनी आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आणि केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.