मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (10:31 IST)

एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार मध्ये एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. या साठी त्यांचे आंदोलन देखील सुरु आहे . आता या आंदोलनामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे .
राज्यात सध्या एसटी कामगारांच्या निलंबनाची कारवाई सुरु आहे .आता पर्यंत एकूण  ७ हजार ६२३ कर्मचारी कामावर रुजू झाले असून एकूण ८४ हजार ६४३ कर्मचारी या संपात सामील झाले आहे. या संपात रोजंदारीचे कर्मचारी देखील आहे त्यांना पुन्हा कामावर येणाचे आवाहन महामंडळाने  केले आहे . ते रुजू झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल .त्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे .
या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच या आंदोलनाचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर रुजू राहून आपले कर्तव्य बजवावे अन्यथा आपल्याला निलंबित करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे .