1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (14:15 IST)

'पुष्पा' चा पर्दाफाश, रक्तचंदनाची तस्करी करत होते

Smuggling of sandalwood in Sangli from Karnataka
चंदनाची तस्करी विषय असलेला  तमिळ चित्रपट 'पुष्पा' हिट झाला असून सर्वांना या सिनेमानं वेड लावलं आहे. मात्र याच चित्रपटासारखी चंदन तस्करीची सांगलीमध्ये पुनरावृत्ती घडली आहे. येथे रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे आणि तब्बल अडीच कोटी रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. तर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
या चंदनतस्करीचे रॅकेट कर्नाटक असल्याचे समजते आहे. सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या 2 कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.
 
रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. कोल्हापूर जकात नाका येथे उड्डाणपूल येथे. फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले आहे. याचा कर्नाटकशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले तर हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.