शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (10:23 IST)

ट्रेकिंग करताना खोल दरीत कोसळून 2 गिर्यारोहकांचा मृत्यू, 12 जण बचावले

नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी डोंगरावर ट्रेकिंग करताना खोल दरीत कोसळून 2 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे तर  तर एक जण गंभीर जखमी झालाय. अनिल वाघ, मयूर मस्के अशी मृतांची नावं आहेत. तर प्रशांत पवार असं जखमीचं नाव आहे. तर 12 जणांना स्थानिकांनी सुखरुप खाली उतरवलं आहे.
 
शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोघांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली पडल्यानं जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण जखमी झाला आहे. प्रस्तरारोहण करणारे इतर 12 जण सुखरूप आहेत. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील  तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवलं आहे. 
 
अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण 15 सदस्य हे हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. यात 8 मुली तर 7 मुलं होती. यातील मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्व शेंडीच्या डोंगरावर चढले. परतीच्या मार्गावर असताना यातील 8 मुली आणि 4 तरुण खाली उतरले. मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंगमधून रोप काढत असताना बोल्डिंग सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले. यांच्यासोबत प्रशांत पवार देखील जखमी झाला.