शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (13:10 IST)

बोलेरोने जोराची धडक दिली, अपघातात पिता-पुत्र ठार

म्हसवड : नरबटवाडी येथील एका अपघातात बाप-लेकाचा दुर्देर्वी मृत्यू झाल्याची बातमी आहे. पोपटराव नरबट व त्यांचा मुलगा विश्वास नरबट असे मृतकांचे नावे आहेत.
 
सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट यांच्या दुचाकीला ढाकणी फाट्यावर अज्ञात बोलेरोने जोराची धडक दिली. या अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात शोकाकुल वातावरणात झाले आहे.
 
पोपट तातोबा नरबट (वय ५२) त्यांचा मुलगा विश्वास पोपट नरबट (वय १३) याला घेवून मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून म्हसवड- मायणी रस्त्याने म्हसवडकडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या  कडेला उभी होती. यास ट्रॅक्टर जोडलेला नव्हता. याचा जवळ दुचाकी असताना समोरुन येणार्‍या बोलेरोने जोराची धडक दिली. धडक देवून बोलेरो न थांबता निघून गेली मात्र या धडकेमध्ये दुचाकीवरील विश्वास नरबट याला जोराचा मार बसल्याने तो जागीच ठार झाला, तर त्याचे वडील पोपट नरबट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.