शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (15:23 IST)

म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले- प्रताप सरनाईक

माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही.एमएमआरडीए प्रकरणात त्यांनी वस्तुस्थिती मांडली. मी काही निरव मोदी किंवा माल्या नाही. की देश सोडून जाईन मी थोडे दिवस मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला, असे सांगत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक महाआघाडी सरकारबाबत नाराजी व्यक्त केली. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उभे राहायला पाहिजे होते. पण तसे काही झाले नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले,असे ते म्हणाले.
 
 गेल्या काही दिवसांपासून गायब असणारे प्रताप सरनाईक  पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवनात दाखल झाले. त्यांनी लिहिलेल्या 'त्या' पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. ईडीकडून सुरु असलेली कारवाई तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत पुन्हा युती करण्याबाबत पत्र लिहिले. त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडली.
 
मी अन्वय नाईक प्रकरणात आवाज उठवला. असे असताना माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उभे राहायला पाहिजे होते. त्याबद्दल मी पत्र लिहले होते. माझ्यावर आणि कुटुंबीयांवर आरोप केले जात होते, तेव्हा मी एकच विचार केला, माझ्या पक्ष प्रमुखाबरोबरच महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी माझ्या आणि कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे राहायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही म्हणून मी पत्र लिहिल, असे स्पष्टीकरण आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले.