1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. So such people should be settled - Chief Minister Eknath Shinde

म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवरील कारवाईचं समर्थन केलं आहे. “पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे,” असं मत व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा घोषणा देणाऱ्यांना या देशात राहण्याचाच अधिकार नाही. त्यामुळे पीएफआयवर जी बंदी घातली ती योग्य आहे.”
 
“या राज्यात, देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
पुढील लेख
Triple massacre in Kolhapur कोल्हापुरात तिहेरी हत्याकांड