मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (11:35 IST)

सामाजिक कार्यकर्त्या स्वामिनी सावरकर यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या स्वामिनी सावरकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचा आई होत्या. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या त्या स्नुषा आणि कै.विक्रम सावरकर यांचा त्या पत्नी होत्या. स्वामींनी सावरकर या पूर्वीच्या मंदाकिनी गोखले होत्या. यांचा जन्म नागपुरात 18 डिसेंबर 1939 रोजी झाला. यांचा विवाह विक्रम सावरकर सह झाला असून त्याना पृथ्वीराज आणि रणजित असे दोन अपत्ये झाले. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा जपत स्वामीनींनी पतीच्या संघटनकार्यात साथ दिली आणि सावरकरांच्या विचाराचे असलेले 'प्रज्वलन्त 'या मासिकाचे कार्य देखील त्या पाहायचा मुरबाडच्या मिलिटरी स्कुलच्या उभारणीत तसेच संस्थेच्या कार्यात त्यांनी सक्रियपणे भाग घेतला. तसेच त्यांनी विक्रम सावरकर यांच्या 'युद्ध आमचे सुरुच्या' नव्या आवृत्ती 'मन:स्वी' , 'कवडसे' पुस्तकात देखील सहभाग घेतला. यशोगीत सैनिकांचे पुस्तक त्यांनी लिहिले. स्वामींनी यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या वर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
 
Edited By - Priya Dixit